Public & Social Life

Student life

  • Dr. Ashish Deshmukh also has a post-graduate degree in Bachelor of Engineer in Industrial Specialisation. MBA Finance & also completed his Ph.D.He was a brilliant student and an active RSS worker since his student life.

2013 to 2019

  • Dr. Ashish Ranjeet Deshmukh was the member of the 13th Maharashtra Legislative Assembly. He represented the Katol Assembly Constituency. He Resigned from the Bharatiya Janata Party. He is the son of former president of Maharashtra Pradesh Congress Committee and former Maharashtra minister Ranjeet Deshmukh.

On 2013

  • विदर्भाच्या मागणीसाठी व जनजागृतीसाठी नागपूर ते सेवाग्राम पदयात्रा काढली.वेगळ्या विदर्भासाठी बेमुदत उपोषण. गडकरी यांनी भाजपा सत्तेत आल्यास विदर्भाचे आश्वासन दिले.

On 2014

  • स्वतंत्र विदर्भ व युवकांच्या उज्वल भविष्यासाठी युथ कन्व्हेन्शनचे आयोजन. गडकरी यांनी १० हजार युवकांना मार्गदर्शन केले.विदर्भाच्या मागणीसाठी व जनजागृतीसाठी बाईकवरून विदर्भात युवा एल्गार रॅली काढली.स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याबाबत तत्कालीन भाजपाध्यक्ष राजनाथसिंग यांना विनंती पत्र.विदर्भस्तरीय सर्वधर्मीय ३८३ जोडप्यांचा सामुहिक विवाह समारंभ सावनेरला घेतला.शिवसेनेने स्वतंत्र विदर्भाला पाठींबा द्यावा. .... प्रेस नोट .आय.आय.एम.ची शाखा नागपूर येथे सुरु करावी, अशी मागणी विधानसभेत केली होती, ती पूर्ण झाली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे अभिनंदन व धन्यवाद केले. ....प्रेस नोट.

On 2015

  • गुजरात ते ओरिसा या रोजगाराभिमुख गॅस पाईपलाईनसाठी धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून पाठपुरावा केला. ही पाईपलाईन काटोल जवळून जाणार आहे.लांडगी नदी, गोंडीदिग्रस येथे लोकसहभागातून जलसंवर्धन अभियानाचे आयोजन केले. जलपुरुष राजेन्द्रसिंग यांना पाचारण करण्यात आले होते. पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यात मोठा वाटा. १८ एप्रिल १९५१ च्या विनोबा भावेंच्या भूदान-ग्रामदान चळवळीतील भूदानाची जमीन शेतकरी, दलित, आदिवासी भूमिहीनांना वितरीत करण्याबाबत पंतप्रधानांना विनंती पत्र. खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्यावर सर्वंकष उपाय-योजना व निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले.संपूर्ण महाराष्ट्रात बिहारच्या धर्तीवर दारूबंदी लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र दिले.नांदेड एमआयडीसीतील सायट्रस प्रोसेसिंग इंडिया या फळ प्रक्रिया व पॅकेजिंग प्रकल्पाला भेट देऊन काटोल-नरखेड परिसरातील शेतकऱ्यांच्या संत्र्याला सोन्याचा भाव मिळावा म्हणून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.पाणी हेच जीवन या विषयावर प्रदर्शनीचे आयोजन रमण विज्ञान केंद्र येथे करण्यात आले. जलपुरुष राजेंद्रसिंग यांचे हस्ते उद्घाटन व मार्गदर्शन केले.स्वलिखित ग्रामविकासाचा पासवर्ड या ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर विधानभवनात प्रकाशन करण्यात आले.विधानसभेत स्वतंत्र विदर्भासाठी जोरदार भाषण केले.

On 2016

  • लांडगी व मदार नदीच्या पुनर्जीवनासाठी १० कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला. प्रकल्पाला यश मिळवून दिले. महाराष्ट्र स्तरावरील अरविंदबाबू देशमुख पत्रकरिता पुरस्कार समारंभाचे आयोजन मुंबई येथे केले. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री फडणवीस, एम.जे. अकबर व श्री. रणजीतबाबू देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. काटोल-नरखेड तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांसाठी मूल्यवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे राबविला. विद्यार्थ्यांचे भविष्य शिस्तबद्ध व उज्वल व्हावे, हा यामागील हेतु होता. विनंती अर्ज समितीचा स्वतःच्या नेतृत्वात अमरावती व यवतमाळ जिल्हा २ दिवसीय पाहणी दौरा केला. प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा दिला. काटोल-नरखेड क्षेत्रात कॅन्सर मुक्त अभियान राबविले. ७२,००० घरांना जनजाग्रुतीसाठी भेटी देण्यात आल्या. आयोजित १० शिबिरांमध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगांची निशुल्क तपासणी करून रुग्णांना निशुल्क शस्त्रक्रिया करून दिल्या.१५० पेक्षा अधिक सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत सकल मराठा-कुणबी मोर्चाची सुर्वेनगर येथील बैठकीत रूपरेषा ठरविली

On 2017

  • व्हायब्रंट विदर्भ हा २ दिवसीय कार्यक्रम नागपूरला घेऊन मोठे उद्योगधंद्यांसाठी सहकार्य करण्यासाठी पत्र मुख्यमंत्र्यांना दिले.उन्नत शेती, समृध्द शेतकरी अभियानाअंतर्गत, आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, नुकसान कसे कमी करत येईल अशा अनेक विषयांवर काटोल येथे भव्य शेतकरी शिबिराचे आयोजन केले.काटोल/नरखेड तालुक्यातील २० गावांमध्ये मोतीबिंदू, मधुमेह, ब्लडप्रेशर मुक्त अभियान व निशुल्क चष्मे वाटप अभियानाचा शुभारंभ. विदर्भातील समस्या प्रकर्षाने मांडून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविले.

On 2018

  • विदर्भातील ११ जिल्ह्यात विदर्भाच्या मागणीसाठी व जनजागृतीसाठी विदर्भ आत्मबळ यात्रा काढली.विदर्भ आत्मबळ यात्रेसंबंधी मुंबई येथे पत्र परिषद,स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन पूर्ण करावे, या आशयाचे पत्र भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना दिले.विदर्भ आत्मबळ यात्रेसंबंधी दिल्ली येथे पत्र परिषद. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांना सोबत घेऊन नागपूर येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.सेवा उपलब्ध करून द्यावी, यासाठी बी.एस.एन.एल.च्या महाप्रबंधकांची भेट घेतली.गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून काटोल येथे राज्य सरकारच्या विरोधात ठिय्या आंदोलन. यशवंतसिन्हा व इतर मोठ्या नेत्यांचे समर्थन मिळाले.पक्षनिष्ठा आणि लोकशाहीचे मागणे हा लेख दैनिक लोकसत्तामध्ये प्रकाशित केला. २०१८-१९ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात काटोल-नरखेड क्षेत्राच्या विकासकामांकरिता कोट्यावधींचा निधी खेचून आणला.विदर्भात मोठे उद्योगधंदे आणून रोजगार निर्मिती करावी, अशी मागणी.नागपूरच्या पावसाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरेंचा विरोध आकसपूर्ण.... उद्धव ठाकरे यांना पत्र.उद्धव ठाकरेंची रिफायनरी प्रकल्प विदर्भात हलविण्यास सहमती. आता मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प विदर्भात आणावा, अशी मागणी केली.... पत्र परिषद (२३ ला नागपूर व २४ ला मुंबई येथे) उद्धव ठाकरेंची भेट घेऊन नागपूरच्या पावसाळी अधिवेशनाला समर्थन मिळावे म्हणून पत्र दिले. तसेच नाणार प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करण्यासाठी विनंती पत्र दिले.नोकरीचा अनुशेष भरून काढत ७२००० प्रस्तावित नोकऱ्यांपैकी २५% नोकऱ्या विदर्भातील युवकांना देण्यासाठी विनंतीपत्र राज्यपाल, मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांना पाठविले.जागतिक हवामान बदलामुळे फ़क़्त शेतीच्या भरवशावर न राहता विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी विदर्भात मोठ्या उद्योगांची गरज..... पंतप्रधानांना पत्र भाजपाकडून जनतेची घोर निराशा झाली. आमदारकीचा राजीनामा दिला.मागील ४ वर्षात राज्य सरकारला धोरणात्मक लकवा झाला असून या सरकारला खाली खेचा, अशा आशयाचे आवाहन पत्र सर्व आमदारांना पाठविले.भाजपाच्या सदस्यत्वाच राजीनामा अमित शाह यांना दिला. दिल्ली येथे कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला.३१ डिसेंबरला मनोरंजनाची स्थळे रात्रभर सुरु ठेवण्यासाठी नागपूरच्या पालकमंत्र्यांना विनंती पत्र दिले.

On 2019

  • राष्ट्रीय स्तरावरील अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमाचे नागपूर येथे आयोजन केले. अरुण शौरी यांना पाचारण केले. • मागील ४ वर्षांपासून काटोल फेस्टिव्हलचे यशस्वी आयोजन. विविध सामाजिक विषयांवर चर्चासत्र, भव्य गणेशोत्सव, सांस्कृतिक/ मनोरंजनाचे कार्यक्रम, युवकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ, रोजगार / उद्योगधंदे / शेतकरी समस्यांवर चर्चासत्र व सरकारकडे लोकहितार्थ कामांसाठी पाठपुरावा करण्यात नेहमी अग्रेसर.
Back to Top